श्री क्षेत्र कोथळीत होणार अद्यावत वॉटर पार्क

0

माजी मंत्री एकनाथराव खडसेंची माहिती

मुक्ताईनगर– पर्यटन विकास अंतर्गत जोमाने कामसुरु असलेल्याश्री क्षेत्र कोथळी येथिल तीर्थक्षेत्र व पर्यटन विकासात आता अद्यावत वॉटर पार्क (अमुझमेंट पार्क) ची भर पडणार आहे. तब्बल २५ कोटीचा कृती आराखडा असलेल्या वाटरपार्क येथे मंजूर करण्यात आला असून पहिल्या टप्प्यातील कामांसाठी ५ कोटी उपलब्ध झाल्याची माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी दिली. श्री संत मुक्ताई मंदीर भाविकांचे श्रद्धास्थान असून तिर्थक्षेत्रास एकनाथराव खडसे यांनी मंत्री पदाच्या कार्यकाळात ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला तर तीर्थक्षेत्र विकास पर्यटन विकासच्या माध्यमातून कोथळी टुरिझम संकल्पना मूर्त स्वरूपात आणण्यासाठी या ठिकाणी अनेक कामे मंजूर केलीत. मार्गशिर्ष, एकादशी, माघ महिन्यात महाशिवरात्री, वैशाख कृष्ण दशमीस संत मुक्ताई पुण्यतिथी व आषाढी एकादशीस लाखोंच्या संख्येने भाविक येतात तर दररोजच्या दर्शनासाठी येथे भाविक मोठ्या संख्येने येतात. याच परीसरात महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळातर्फे ॲम्फीथिएटर, टुरिस्ट इन्टरप्रिटीशन सेन्टर, कल्चरल हॉल, कॅन्टीन इ. बांधकामे झालेली आहेत तसेच राज्याच्या ग्रामविकास खात्यामार्फत संत मुक्ताई मंदीराच्या जिर्णोद्धाराचे काम प्रगतीत आहे. मुबलक प्रमाणात नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत असल्याने वॉटर र्स्पोर्ट्स करीता बांधकामे केल्यास जिल्ह्यातील नागरीकांना मनोरंजनाचे साधन उपलब्ध होणार ही भूूमिका आमदार खडसे यांनी घेतली होती. त्या दृष्टीने या ठिकाणी ॲम्युझमेन्ट पार्कचे बांधकाम प्रस्तावित करण्यात आले आहे. यात पहिल्या टप्प्यात साधारण 1 एकर क्षेत्रामध्ये ॲम्युझमेन्ट पार्क तयार करण्यात येत आहे. या अम्युझमेन्ट पार्कमध्ये मल्टी लेन राईड, ट्युबॲन्डफ्लोट राईड, थंडर क्रुझ स्लाईड,ओपन बॉडी स्लाईड, टायफुन टनेल , क्रुसेडर राईड करीता टायफुन टनेल, रेनबो टनेल असे विविध प्रकारचे वॉटर स्पोर्ट उपलब्ध होणार आहे.