पहिल्या टप्प्यातील कामांसाठी पाच कोटी मंजूर ; सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे यांची प्रमुख उपस्थिती
मुक्ताईनगर- पर्यटन विकास योजनेंतर्गत जोमाने काम सुरू असलेल्या श्री क्षेत्र कोथळी येथे तीर्थक्षेत्र व पर्यटन विकासात आता अद्यावत वॉटर पार्क (अमॅझमेंट पार्क) ची भर पडणार असून तब्बल 25 कोटीचा कृती आराखडा असलेला वॉटर पार्क येथे मंजूर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील कामांसाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून या कामाचे भूमिपूजन सोमवार, 29 रोजी राज्याचे पर्यटन व रोहयो मंत्री ना जयकुमार रावल यांच्या हस्ते होत आहे. प्रसंगी सुमारे एक कोटी रुपये खर्चाच्या सभागृहाचे लोकार्पण सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे असतील.
यांची राहणार उपस्थिती
खासदार रक्षा खडसे, महानंद मुंबईच्या अध्यक्षा मंदा खडसे, जेडीसीसी बँक अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे संयोजक डॉ.राजेंद्र फडके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, पंचायत समिती सभापती शुभांगी भोलाने, उपसभापती प्रल्हाद जंगले, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, भाजपा तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, जिल्हा परीषद सदस्य जयपाल बोदडे, निलेश पाटील, वनिता गवळे, वैशाली तायडे, नगराध्यक्ष नजमा तडवी, माजी सरपंच नारायण चौधरी, उपसरपंच उमेश राणे आदी उपस्थित राहणार आहेत.