श्री क्षेत्र पंढरपूरातील डिगंबर महाराज मठात आषाढी यात्रोत्सवाची तयारी पूर्ण

0

फैजपूर- श्री क्षेत्र पंढरपूर येथे डिगंबर महाराज मठात आषाढी यात्रा जय्यत तयारी पूर्ण होऊन यावल व रावेर तालुक्यातील भाविकांसाठी सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. डिगंबर महाराज मठ संस्थेने श्री क्षेत्र पंढरपूर येथे एक एकर जागेवर तीन मजली दोन इमारतींची भव्य अशी भक्त निवासाची उभारणी केली आहे. या मठात आषाढी यात्रा महोत्सव 17 जुलै ते 25 पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. वै.डिगंबर महाराज यांचा दिंडी सोहळा 15 जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहचत आहे या काळात दररोज श्रीमद भागवत कथा व रात्री कीर्तन तसेच हरीपाठ कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. वारी दरम्यान या मठात दीड ते दोन हजार वारकरी या मठात येतात.

विविध महाराजांची कीर्तन होणार
दररोज सकाळी व संध्याकाळी अन्न-दान कार्यक्रम होईल. यादरम्यान स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून सर्व भाविकांना शंभर टक्के शौचालयाची व्यवस्था व प्लास्टिक मुक्त निर्मल वारी म्हणून अभियान राबविण्यात येणार आहे. येणार्‍या वारकर्‍यांमध्ये व्यसनाने होणारे दुष्परीणाम तंबाखू , गुटखा, धूम्रपान या व्यसनांना आळा घालण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे तसेच हभप दिनकर महाराज, गोपाळ महाराज, दुर्गादास महाराज नेहेते, धनराज महाराज, रवींद्र महाराज हरणे, भाऊराव महाराज, अरुण महाराज , दगडू महाराज यांचे कीर्तन होणार आहे. यावेळी लोकप्रतिनिधी व विविध संस्थाचे पदाधिकारी भजनी मंडळ, सेवा मंडळ यांची उपस्थिती राहणार आहे. या सर्व उपक्रमात भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थाध्यक्ष नरेंद्र नारखेडे, उपाध्यक्ष घनश्याम पाटील, सचिव विठ्ठल भंगाळे, विजय ढाके, योगेश भंगाळे, जयराम पाटील, आत्माराम भंगाळे, किशोर बोरोले यासह संस्थेच्या सर्व विश्वस्तांनी आवाहन केले आहे.