यावल : तालुक्यातील आडगाव जवळील श्रीक्षेत्र सातपुडा निवासनी आई मनुदेवीच्या मंदिराजवळ पुजा साहित्य विक्री करणार्या एका व्यावसायीकाने सहकारी व्यावसायीकास मारहाण केली. ही घटना शुक्रवारी सकाळी 10 वाजता घडली. या प्रकरणी यावल पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
यावल पोलिसात गुन्हा दाखल
आडगाव, ता.यावल येथुन जवळचं सातपुड्याच्या कुशीत आई मनुदेवी मंदिर आहे. या तीर्थक्षेत्रावरील पूजा साहित्य व्यावसायीक विश्वदिप सुरेश पाटील (रा.आडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंदिरा जवळील संजय धडकु पाटील (आडगाव) यांचे पुजा साहित्य विक्रीचे दुकान आहे. या दुकानात शुक्रवारी सकाळी 10 वाजता पाटील दारू पिऊन आले हव काही एक कारण नसतांना त्यांनी विश्वदिप पाटील यांना तु माझ्या दुकानातील पुजा साहित्य चोरी केली म्हणून वाद घातला व मारहाण केली. या प्रकरणी यावल पोलिसात विश्वदिप पाटील यांच्या फिर्यादीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.