श्री क्षेत्र लेण्याद्रीला भाविकांची मोठी गर्दी

0

जुन्नर : श्री क्षेत्र लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मज गणपतीच्या दर्शनासाठी शुक्रवारी भाविकांनी गर्दी केली होती. गणेश चतुर्थीनिमित्त देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मंदिरात फुलाची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

शुक्रवारी सकाळी गणपतीला महाअभिषेक करण्यात आला. यानंतर मंदिरात नामदेव महाराज वाळके यांचे गणेश जन्माचे कीर्तन झाले. देवस्थानचे अध्यक्ष शंकर ताम्हाणे, सेक्रेटरी गोविंद मेहेर खजिनदार सदाशिव ताम्हाणे विश्वस्त काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, प्रभाकर जाधव, जितेंद्र बिडवई तसेच कर्मचारी व भाविक उपस्थित होते. राज्यभरातील भाविकांनी श्री गणेशाच्या दर्शनासाठी दिवसभर गर्दी केली होती. देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी विविध सेवा पुरविण्यात आल्या. कीर्तनानंतर देवस्थानचे वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.