श्री गजानन महाराज पालखी प्रस्थान

0

खामगाव (अमोल सराफ)। खामगाव शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानचा ‘श्री’चा पालखी सोहळा पंढरपूर पायदळ वारीकरीता भजनी दिंडी, गज व अश्‍वासह आज 19 जून रोजी सकाळी 7 वाजता प्रस्थान झाले. संपुर्ण महाराष्ट्रातून श्री क्षेत्र पंढरपूरला बहूतेक सर्व संताच्या पालख्या दिंडीसह नेण्याची परंपरा आहे. भक्त आणि भाविकांना तीर्थयात्रा घडाव्यात आणि वारकरी संप्रदायाच्या महान परंपरेची जपणूक व्हावी या उद्देशाने श्री गजानन संस्थानचे 1968 पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारी व श्री क्षेत्र आळंदीला मोटारीने पालखी दिंडीसह नेण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. याशिवाय श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर, श्री क्षेत्र पैठण, श्री क्षेत्र मुक्ताईनगर याठिकाणी देखील संस्थानची वारी निमित्त पालखी जात आहे. आषाढी वारीकरीता पंढरपुरला जाताना वारकरी दरवर्षीसोबत निघतात. दिंडीमुळे विवेक, वैराग्य, भक्ती व ज्ञान या तत्वांचा लोकांना बोध होतो. व आध्यात्मिक कार्य गतीमान होवून धर्माप्रती श्रध्दा व भावना वृध्दीगंत होतात. तसेच लोकजीवनावर आध्यात्मिकतेचा प्रसाद पडण्यास मदत होते.

श्रींच्या पालखीचा प्रवास
श्रींच्या पालखी सोहळ्याचे हे 51 वे वर्ष आहे. शेगाव ते श्री क्षेत्र पंढरपूरपर्यंत 750 कि.मी. आणि श्री क्षेत्र पंढरपूर ते शेगावपर्यंत परतीचा प्रवास हा 550 किलोमीटर आहे. असा एकुण प्रवास 1300 किलोमीटरचा आहे.

वाटेत अनेक गावे
दारिद्रय, अज्ञान, अंधश्रध्दा, व्यसनाधिनता अशा अनेक समस्यांनी ग्रासलेली अनेक छोटी गावे पायी वारीच्या वाटेत आहेत. या गावामध्ये हरीनामाचा प्रसार करून तेथील ग्रामस्थांचे जीवन (आयुष्य) सुखकर करणे, तेथील व्यसनाधिनता, अंधश्रध्दा दूर करणे हे या वारीमागचे आणखी एक कारण संस्थानचे पायी वारीकरीता श्री महाराजांची चांदीची नवीन पालखी बनारस येथील कारागिर आणून तयार करून घेतली आहे. त्यावरील नक्षीकाम अत्यंत कलापूर्ण असून ही पालखी पाहताक्षणीच अंत:करणातील भक्तीभाव उंचबळून येतो.

असा राहिल पालखीचा मार्ग
19 जून रोजी श्री क्षेत्र नागझरी, गायगाव, भौरद, अकोला, भरतपूर, वाडेगाव, देऊळगाव, पातुर, मेडशी, श्री क्षेत्र डव्हा, मालेगाव, शिरपूर जैन, चिंचाबा पेन, म्हसला पेन, किनखेडा, रिसोड, पानकन्हेरगाव मार्ग 21 रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहचेल. पंढरपूर येथे 21 ते 26 जूनपर्यंत मुक्काम राहून कुडवाळी, भगवान बार्शी, पाली, बिड, गेवराई, शहापूर, लालवाडी, जालना, सिंदखेडराजा, जालना, लोणार, मेहकर, जानेफळ, शिर्ला नेमाने, आवार व खामगाव येथे 16 ऑगस्ट रोजी मुक्काम व 17 ऑगस्ट रोजी शेगाव कडे प्रस्थान.