विसर्जनस्थळी विद्युत रोषणाई करण्याचे आदेश
नवापुर । शहरात सातव्या व अनंत चर्तुथी या दिवशी श्री गणेश विसर्जन होणार आहे. यामुळे आज श्री गणेश विसर्जन मार्गाची पहाणी तहसीलदार प्रमोद वसावे, पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत, न.पा मुख्यधिकारी राजेंद्र शिंदे, कार्यालय निरीक्षक मिलिंद भामरे, न.पा बांधकाम अभियंता सुधिर माळी, पुरवठा निरीक्षक मिलिंद निकम, पो.का. निजाम पाडवी यांनी केली. सर्व प्रथम लाईट बाजारात असलेली जामा
मजिद लगत रस्त्यांची पहाणी करुन लाईट बाजार, टर्नल प्लॉट, शिवाजी रोड, दत्त मंदीर, आंबेडकर चौक,नविन महादेव मंदीर, या रस्त्याने नेशनल हायवे 6 वर असेलेल्या रंगावली नदीचा पुलाचा खाली विसर्जन ठिकाणाची पहाणी केली.
16 सीसीटिव्ही कॅमर्यांद्वारे नजर
यावेळी तहसिलदार प्रमोद वसावे यांनी न.पा अभियंता यांना विविध सूचना दिल्या. यात वसावे यांनी ज्यांनी रस्त्यांवर विटा,रेती,खडी टाकली असेल अशा संबंधीत व्यक्तींना नोटीसा द्या,जेणेे करुन गणेश विसर्जनाचा वेळी अडथळा येऊ नये असे सांगितले. तसेच विसर्जनाचा ठिकाणी विद्युत रोशनाई करा तसेच शांतता कमेटीत सदस्य व गणेश मंडळानी जी मागणी केली आहे त्याची पुर्तता करा अशी सूचना देखील यावेळी केली. रस्त्यांवरील खड्डे त्वरीत बुजुन दुरुस्ती करण्याचे सांगितले. नवापुर शहरात उद्या सातव्या दिवशी 27 श्री गणेशाचे विसर्जन होणार आहे. तर अनंत चर्थुतीला 28 श्री गणेशाचे विसर्जन होणार आहे. पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. या कामी एक उपविभागीय पोलिस अधिकारी 1 पोलिस अधिकारी 7 पोलिस कर्मचारी 50,होमगार्ड 45,एस.आर.पी.तुकडी 1 असा पोलिस बंन्दोबस्त लावण्यात आला आहे. तसेच शहरात 16 सीसीटीव्ही कॅमेरे असून पोलीसांचा तिसरा डोळा हालचालीवर लक्ष ठेवुन आहे ऱोज अपडेट घेण्यात येत आहे.