श्री चक्रधर गुरुकुल महाविद्यालयाची पदयात्रा संपन्न

0

खिर्डी । श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालय, फैजपुरतर्फे श्री क्षेत्र चांगदेव पदयात्रा काढण्यात आली. पहाटे 5 वाजता श्रीदत्त प्रभुंच्या चरणी विडा अवसर आर्पण करुन पदयात्रेला प्रारंभ झाला. सावदा येथे श्रीकृष्ण मंदिरात जावळेबाबा शास्त्री यांनी पदयात्रेकरुंचे स्वागत केले. त्यानंतर मानेकरबाबा शास्त्री यांनी स्वागत करुन
नाश्ता दिला.

तेथे देवपुजा करुन गाते, उदळी हायस्कूल येथे तांदलवाडी येथील श्रीदत्त मंदिर संस्थानाचे अध्यक्ष वसंत महाजन यांचेकडे चहापानाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मानपुर गावाच्या पुढे तांदलवाडी येथील प्रगतीशिल शेतकरी वैभव महाजन यांचेकडून वनभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

श्रीकृष्ण मंदिरात झाला समारोप
तेथून प्रस्थान केल्यानंतर दुपारी 4 च्या सुमारास श्रीक्षेत्र चांगदेव येथील श्रीकृष्ण मंदिरात पदयात्रा पोहोचली. तेथे दर्शन घेऊन पदयात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी श्रीचक्रधर गुरुकुल विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार राजाराम महाजन, उपाध्यक्ष उल्हास चौधरी यांची उपस्थिती होती.