चोपडा । येथील पाटील गढीतील पुरातन अशा श्री.चौण्डेश्वरी (शाकंबरी) माता मंदिराचा जिर्णोद्धार व नूतन मंदिरातील मुर्तीचा प्राणप्रतिष्ठापण सोहळा येथील श्री देवांग कोष्टी समाजाच्यावतीने 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. सुमारे दिडशे वर्षाचा इतिहास असणार्या या मंदिराचे नुकतेच पुनर्निर्माण करण्यात आले असून जिर्णोद्धार व श्री.चौण्डेश्वरी मातेच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठतेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी माजी विधानसभाध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार कैलास पाटील, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड संदिप पाटील, प्रा.शांतिलाल बोथरा, भाजपा नेते घनश्याम अग्रवाल, पिपल्स बँक चेअरमन चंद्रहास गुजराथी, नगरसेवक तथा गटनेते जीवन चौधरी, नगरसेविका शोभा देशमुख, माजी कृउबा सभापती गोपाळ पाटील, रविंद्र मराठे यांच्यासह अरुण वरुडे (पुणे), पंडीतराव ईदाते (गंगाखेड), विजय लोळे (अकोला), चंद्रकांत बर्गे (औरंगाबाद) यांच्यासह राज्यातील समाजाच्या विविध भागातील प्रतिनिधींची व विश्वस्त दामोदर मावलकर (चोपडा) यांची उपस्थिती लाभणार आहे.
उपस्थितीचे आवाहन
3 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता शोभायात्रा, दुपारी पूजा तर 4 रोजी द्वितीय दिन संकल्प-पुजन,दुपारी पूजन व आरती तसेच रात्री अशोक वनारसे यांची संगीत मैफिल तर 5 रोजी पूर्णाहुती, महाआरती, महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता यानिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे आचार्य वेदमुर्ती पं.अलोकशास्त्री हे असणार आहेत. या तीन दिवसीय कार्यक्रमांना उपस्थिती द्यावी, असे आवाहन चोपडा येथील श्री देवांग कोष्टी समाजाचे अध्यक्ष सुभाष तरोडे, उपाध्यक्ष देवीदास मांडोळे, सचिव विलास कोष्टी, खजिनदार संतोष दुशिंग, सहसचिव चंद्रशेखर साखरे यांच्यासह संचालक मंडळाने केले आहे.