शिंदखेडा । खान्देशातील सुप्रसिद्ध श्रीक्षेत्रदत्तवायपुर यात्रेला दुसर्या दिवशी भाविकानी दर्शनासाठी येऊन संसारपयोगी वस्तू खरेदी करण्यावर अधिक भर दिला तमाशालाही हजेरी लावली. यात्रोउत्सवास पहिल्या दिवशी विविध राजकीय पदाधिकार्यांनी भेटी दिल्या. त्यात शिंदखेडा न.पा.निवडणुक असल्याने यात्रेत तालुक्यातील व जिल्ह्यातील राजकीय पदाधिकारी पाठ फिरवली आहे. कृउबा सभत्तपती नारायण पाटील, जि.सदस्य कामराज पाटील, किशोर पाटील आदींनी यात्राउत्सवास भेटी देवून दर्शन घेतले. तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. हुंडा बळी, पर्यावरण बचाव, बेटी बचाव, हागणदारी युक्त अभियान, पाणी आडवा पाणी जिरवा आदी विषयांवर जनजागृती व प्रबोधन करण्यात आले.
तगतरावासाठी लिलाव
मंदीर परिसरात व गावात मिरवणूक काढून यात्रेची शोभा वाढवली. दत्तवायपूर गाव दरवाजा जवळ तगतरावाला बैल जुपंल्याचा मानाचा लिलाव पद्धतीने बोली लावण्यात आली होती. त्यात प्रेमराज हिलाल पाटील यांनी 2500 रूपयाला बोली देऊन तगतरावाला बैल जुंपण्याचा मान घेतला. तसेच दोन कि.मी.अंतारावर असलेले चादंगड ग्रामस्थ ही दरवर्षी प्रमाणे तगतरावाची वाजत गाजत मिरवणूक यात्रेत आणली. यात्रा उत्सवास बाहेर गावावरून येणारे भाविकाना महाप्रसादाचे दरवर्षी प्रमाणे वाटप करण्यात आले त्यासाठी दत्तवायपूर येथील विनायक झाऊरू पाटील, व मोतीलाल यादव पाटील यांनी स्वखर्चाने वाटप केले. दत्त महाराजाच्या यात्रेमध्ये नवस फेडण्याची संख्या जास्त असते. श्री गुरूदत्त विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी यात्राउत्सवास भाविकांसाठी स्वयंसेवकाची भुमिका बजविली.