श्री धुनिवाले दादाजींचा पालखी उत्सव

0

जळगाव । हिंदू धर्माच्या नववर्षानिमित्त गुढीपाडव्याला श्री सदगुरू धुनीवाले दादाजी यांचा पालखी उत्सव साजरा होत आहे. खेडी येथे श्री दादाजी महाराज यांची पालखी मिरवणूक 28 रोजी काढण्यात येणार आहे. येथील जुने जळगाव परिसराला लागुन असलेल्या खेडी येथे श्री दादाजी धुनिवाले यांचे मंदिर ( दरबार) आहे. सालाबादाप्रमाणे यंदाही नववर्षाच्या स्वागतार्थ तसेच सुख, शांती व समृध्दी लाभो यासाठी श्री सदगुरू धुनीवाले दादाजी यांची पालखी मिरवणूक दि. 28 रोजी निघणार आहे.

उत्सवात सहभाग नोंदविण्याचे आवाहन
श्री दादाजी दरबार खेडी येथे सकाळी 9.30 वाजता पालखीचे विधीवत पुजन करण्यात येवुन पालखीमध्ये सदगुरू धुनीवाले दादाजी यांची प्रतिमा विराजमान केली जाते. सोबत हरीहर भोले भगवान व नर्मदा नदीची प्रतिमा पालखी मध्ये सुशोभीत करून ठेवली जाते. आरती करून प्रसादर वाटप करण्यात येतो. यानंतर भाविक जयघोष करीत पालखी मार्गस्थ करणार आहेत. खेडी परिसरात पायी पालखी मिरवणूक सवाद्य काढण्यात येणार आहे. सर्व भाविकांनी या पालखी उत्सवाला उपस्थिती द्यावी असे आवाहन श्री हरिहर नित्यसेवा मंडळ संचलीत दादाजी दरबार तर्पेै करण्यात आले आहे.