श्री राजेशहाजी मित्र मंडळातर्फे धान्य वाटप

0

अमळनेर-येथील न्यू प्लॉट भागातील शनीमंदिर गल्ली परिसरातील श्री राजेशहाजी मित्र मंडळाच्यावतीने गोरगरीब बांधवांना डाळ, तांदूळचे वाटप करण्यात आले. लहानग्यांना बिस्किटे वाटण्यात आली.

सीआरपीएफ जवान योगेश पवार,महेश राजपूत,आबा माळी,प्रशांत जगदाळे,प्रशांत लंगरे,मयूर भावसार,विशाल खिलोसिया,शुभम वैष्णव,हार्दिक खिलोसिया,अरुण महाजन,बंटी ठक्कर,वत्सल शाह,प्रणव मुंडके,प्रसाद जानवे आदींच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी अमळनेर बाजार समितीचे उपसभापती अँड एस. एस. ब्रह्मे, सचिन खंडारे, सरकारी वकील अँड राजेंद्र चौधरी, हेमंत ठक्कर, चेतन शर्मा आदींचे सहकार्य लाभले. जुना बस स्टॅण्ड शेजारील पांचाळ वस्तीतुन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार अनिल भाईदास पाटील, सहा पोलीस निरीक्षक एकनाथ ढोबळे, अलिहुसेन बोहरी, शीतल देशमुख, किरण पाटील, चेतन राजपूत, संजय चौधरी,सोमचंद संदानशिव,अँड अमोल ब्रह्मे, एल टी पाटील,विजय जैन आदी उपस्थित होते.