श्री रामजन्मभूमी न्यासच्या उपाध्यक्षपदी दिलीप कांबळे !

0

पुणे : महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांची अयोध्या येथील श्री रामजन्मभूमी न्यासच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दिलीप कांबळे हे भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते समजले जातात. या पदावर नियुक्ती झाल्याने त्यांचा राष्ट्रीय राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात प्रवेश झाल्याचे सूतोवाच करण्यात येत आहे.

दिलीप कांबळे हे रामजन्मभूमी न्यास आणि राष्ट्रीय संघाच्या कायार्साठी नेहमी क्रियाशील होते. त्यामुळेच त्यांना उपाध्यक्षपदी नेमणूक केल्याचे सांगितले जात आहे .त्यांना निवडीचे पत्र न्यासचे अध्यक्ष श्री म.जन्मेजय शरणजी महाराज स्वामी यांनी नुकतेच दिले आहे .