Ganesha devotee of Khadki died due to drowning during Shri Visarjan चाळीसगाव : जामनेरच्या तरुणाचा बुडणार्या बालकाला जीवदान देताना मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील सौरव शत्रुघ्न मोरे (17) या बालकाचा श्री विसर्जनादरम्यान डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजता घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
श्री विसर्जनादरम्यान बालकाचा मृत्यू
चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक गावातील सौरव शत्रुघ्न मोरे (17) हा श्री विसर्जनासाठी तीन मित्रांसोबत अंबुजा कंपनीच्या मागे असलेल्या डोहात गेला होता असता त्याने पाण्यात उडी घेतली. यावेळी सोबत असलेले दोन मित्र डोहाच्या बाहेर उभे होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने सौरव मोरेचा पाण्यात बुडू लागला तर दोन्ही मित्रांनी आरडाओरड केली. यावेळी खदानीच्या बाजूला काम करणार्या कामगारांनी धाव घेत सौरवला बाहेर काढले मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. सौरवच्या पश्चात आई कल्पनाबाई, भाऊ भूषण असा परीवार आहे.