सांघिक कामगिरीमुळे मिळाले यश -प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह
भुसावळ- हिंदी सेवा मंडळ संचलित श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन परीषदेकडून (नॅशनल क्रिडिटेशन अँड असेसमेंट कौन्सिल) अर्थात नॅकने केलेल्या परीक्षणात पाच वर्षांसाठी ‘बी.प्लस.प्लस’ श्रेणी प्रदान करण्यात आली. 2019 मधील नवीन नियमांच्या परीक्षणांर्तगत बीप्लसप्लस दर्जा मिळालेले तांत्रिक क्षेत्रातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय ठरत महाविद्यालयाने आपला दर्जा सिद्ध केला आहे. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या उत्कृष्ट सांघिक कामगिरीमुळेच हे यश मिळाल्याचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह म्हणाले.
29 व 30 रोजी समितीकडून पाहणी
तेलंगणा येथील जवाहरलाल नेहरू तंत्रशास्त्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.कुमार वेल्लांकी, आंध्रप्रदेशच्या श्री वेंकटेश्वरा युनिव्हर्सिटीचे प्रा. डॉ. वानिमिरेड्डी दिवाकर रेड्डी, गुजरात विद्यापीठाच्या आयटी विभागाच्या प्राध्यापक डॉ.सविता गांधी यांच्या पथकाने 29 व 30 रोजी महाविद्यालयाची पाहणी केली. महाविद्यालयात डॉ.राहुल बारजिभे यांनी नॅक समन्वयक म्हणून काम पाहिले.
महाविद्यालयावर शुभेच्छांचा वर्षाव
या यशाबद्दल हिंदी सेवा मंडळ अध्यक्ष जे.टी.अग्रवाल, सचिव मधूलता शर्मा, कोषाध्यक्ष अॅड.एम.डी.तिवारी व सर्व पदाधिकार्यांनी सर्वांचे विशेष अभिनंदन केले. नॅक मूल्यमापन विभाग समन्वयक म्हणून प्रा.धीरज अग्रवाल, डॉ.गिरीश कुलकर्णी, डॉ.पंकज भंगाळे, प्रा.अविनाश पाटील, प्रा.सुधीर ओझा, प्रा.अजित चौधरी, प्रा.दिनेश पाटील यांनी काम पाहिले होते.