भुसावळ : राज्य सामायिक परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) एमएचटी-सीईटीच्या परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांना विशेष तयारी करावी लागते. इंजिनिअरींग पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी ऑनलाईन होणार आहे. या परीक्षा पद्धतीचा सराव व्हावा, यासाठी भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयानतर्फे मोफत ऑनलाइन सराव परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी घरीच बसून परीक्षा देऊ शकणार आहे.
जून महिन्यात होणार सराव परीक्षा
सीईटीच्या पॅटर्नबाबत विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत असतात. ही बाब लक्षात घेऊन दिनांक 12, 15 आणि 18 जून 2020 रोजी रोजी सराव परीक्षा घेण्यात येणार आहे, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी सांगितले. सराव परीक्षेसाठी https://tinyurl.com/ssgbcoet या लिंकवर नोंदणी करावी तसेच अधिक माहिती www.ssgbcoet.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळावा म्हणून गेल्या तीन वर्षांपासून गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे सराव परीक्षा घेतली जात आहे. गतवर्षी 340 विद्यार्थी सहभागी झाले होते. यंदा 12 ते 18 जून या कालावधीत या दोन्ही सराव परीक्षांसाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज स्विकारले जात आहेत अशी माहिती डीन डॉ.राहुल बारजिभे यांनी दिली.
विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन
अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रवेश प्रक्रियेविषयी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले जाणार आहे. बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी आणि पालकांनी प्रक्रिया समजून घ्यावी व भविष्यात लागणार्या कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी त्यासाठी मार्गदर्शन दिले जाणार आहे, असे डॉ.पंकज भंगाळे यांनी कळविले आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील डॉ.गिरीष कुळकर्णी, प्रा.अविनाश पाटील, प्रा.अजित चौधरी, डॉ.दिनेश पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.