भुसावळ- शहरातील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नॅक मूल्यांकनासाठी दाखल झालेल्या समितीने 29 व 30 रोजी महाविद्यालयाची तपासणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाविद्यालयाच्या कामकाजाबाबत समितीने समाधान व्यक्त केले. समितीचे चेअरमन म्हणून तेलंगणा येथील जवाहरलाल नेहरू तंत्रशास्त्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.कुमार वेल्लांकी, आंध्रप्रदेशच्या श्री वेंकटेश्वरा युनिव्हर्सिटीचे प्रा.डॉ.वानिमिरेड्डी दिवाकर रेड्डी, गुजरात विद्यापीठाच्या आय.टी.विभागाच्या प्रा.डॉ.सविता गांधी समिती सदस्य म्हणून उपस्थित होत्या.
नॅक समितीने व्यक्त केले समाधान
सांस्कृतिक विभागाच्या वतीने विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याचे डॉ.कुमार वेल्लांकी यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे उच्चशिक्षण मिळावे यासाठी प्रत्येक महाविद्यालयांनी ‘नॅक’कडून मूल्यांकन करून घेणे महत्वाचे आहे, असे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह म्हणाले. विभागप्रमुख प्रा.सुधीर ओझा, डॉ. पंकज भंगाळे, डॉ.गिरीश कुलकर्णी, प्रा.अविनाश पाटील, प्रा.अजित चौधरी, प्रा.दिनेश पाटील तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.