श्री संत मुक्ताई पांडुरंगाच्या भेटीला

0

मुक्ताई पादुकाचे पालखीचे प्रस्थान ; यंदा निर्मल वारी हरित वारी

मुक्ताईनगर- श्री संत मुक्ताई पादुकांचे पालखीसह श्री क्षेत्र कोथळी, मुक्ताईनगर येथुन सोमवारी पांडुरंगाच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र पंढरपूर कडे प्रस्थान झाले. या भक्तिमय सोहळ्याप्रसंगी माजी महसूल मंत्री मुक्ताई एकनाथराव खडसे, महानंद मुंबईच्या अध्यक्षा मंदा खडसे, अ‍ॅड.रविंद्रभैय्या पाटील, जि.प.उपाध्यक्ष नंदू महाजन, पंचायत समिती सभापती शुभांगी भोलाने, विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर समिती सदस्य शिवाजीराव मोरे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर समिती सदस्य माधवी निगडे, सूर्यकांतजी भिसे, निवृत्तीभाऊ पाटील, नरेंद्रभाऊ नारखेडे, हभप रवींद्र महाराज हरणे, ह.भ.प. उद्धव जुनारे महाराज आदी उपस्थित होते.

यंदा निर्मल वारी हरित वारी हा उपक्रम
यावर्षी मुक्ताई संस्थानने ‘निर्मल वारी हरीत वारीश हा उपक्रम राबविला आहे. वारी मध्ये कुठलेही प्लास्टिक साहित्य जसे द्रोण पत्रावळी वापरण्यात येणार नाही. वारीमधील प्रत्येक वारकर्‍याला 50 बिया असलेले पाकीट देण्यात आले व रस्त्याने या बिया टाकून जागोजागी वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.