मुक्ताईनगर- श्री संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी येथून निघालेल्या मानाच्या मुक्ताबाई पालखीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचा श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार 2018 द्वितीय क्रमांक पटकावला. महाराष्ट्र शासन स्थापीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्यावतीने आषाढी वारीत महाराष्ट्रातील मानाच्या सात पालखी सोहळ्यातील दिंड्यातून यावर्षी पासून प्रथमच निर्मल वारी हरित वारीही संकल्पना राबवून प्लास्टिकच्या वस्तू द्रोण, ग्लास, पत्रावळ्यांचा वापर न करणे,वृक्षारोपण व ईतर सामाजीक जागृती करणे आदि.विषय देवून तिन बक्षिसे जाहीर केली होती. श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळा प्रस्थान दिनी अभिमानाची सुरूवात मुक्ताईनगर येथे केली होती.
निर्मत वारीने केले ठिकठिकाणी वृक्षारोपण
या निर्मल वारी हरित वारी अभियानांतर्गत सहभागी होवून मुक्ताबाई दिंडी ने ठिकठिकाणी मुक्ताईवृक्ष नावाने वृक्षारोपण केले. प्रत्येक वारकरी जवळ विविध बियाण्यांची पाकिटे देण्यात आलेली रस्त्याने लावणी केली. प्रत्येक वारकरी जवळ ताट, तांब्या, वाटी देत प्लास्टिकच्या वस्तू द्रोण, ग्लास पत्रावळ्यांचा वापर टाळून अभियान राबविले. निर्मल वारी हरित वारी समितीने पंढरपूरपर्यंत अनेकदा परीक्षण केले होते. आषाढी एकादशी पर्वावर सात सोहळ्यातील 700 दिंड्यातून निवड समितीने पुरस्कार जाहीर केले. त्यात श्री मुक्ताबाई दिंडी कोथळी मुक्ताईनगर, जि.जळगावला द्वितीय पारितोषिक मिळाले. मंदिर समिती अध्यक्ष डॉ.अतुल भोसले, निवड समिती सदस्य शिवाजीराव मोरे, प्रकाश बुवा जवंजाळ, माधवी निगडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पाटबंधारे, परीवहन मंत्री दिवाकर रावते. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते अॅड. भैय्यासाहेब रविंद्र पाटील व सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे यांनी पुरस्कार स्विकारला . पंचाहत्तर हजार रोख व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
वारकर्यांच्या सहभागानेच पुरस्कार -अॅड.रवींद्र पाटील
श्री विठ्ठल निर्मल दिंडीला द्वितीय पुरस्कार दिल्याबद्दल निवड समितीचे आभार. मुक्ताबाई पालखी मार्गात मुक्ताईनगर ते पंढरपूरपर्यंत अनेकांनी सहकार्य केले. विशेषतः वारकरी भाविक अन्नदाते, चहा,फराळ दाते मंडळींच्या सहभागानेच पुरस्कार मिळाला आहे. अभियान वारीपर्यंत मर्यादित न राहता नेहमीच प्लास्टिकच्या वस्तूचा वापर टाळावा, असे आवाहन श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांनी केले आहे.