मुक्ताईनगर : तालुक्यातील श्री क्षेत्र मेहूण तापी तिरावर शुक्रवारपासून श्री संत सोपानकाका समाधी सोहळ्याला सुरुवात झाली. 15 डिसेंबरपर्यंत हा सोहळा चालणार असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक कथावाचक आहेत. जीवनात सुख, शांती, समृद्धी व लक्ष्मी टिकवून ठेवण्यासाठी श्री विश्वशांती महायज्ञ होणार आहे.