शेंदुर्णी । येथून जवळच असलेल्या जगप्रसिध्द अजिंठा लेणीच्या पायथ्याशी फर्दापुर जवळील सोयगाव रोडरील जंगलातांडा येथे कल्पवृक्ष कलाशाकार तिर्थक्षेत्राचे निर्माण कार्य पुर्ण झाले असुनतेथील नूतन नवग्रह मंदीर व सहस्त्रफणी पार्श्वनाथ भगवंताच्या मुर्ती पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन 3 ते 10 डिसेंबर 2017 पर्यंत आयोजित केले आहे. सदर तिर्थाचे निर्माण प.पु. आचार्य दर्शनसागरजी महाराज यांच्या प्रेरणेने प.पु. श्री कल्पवृक्षनंदीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने पूर्णत्वास येत आहे. सदर कार्यक्रमास अनेक साधु-साध्वींचे सान्निध्य लाभणार असुन त्यात मुख्यत्वे आचार्य दर्शनसागरजी महाराज, एलाचार्य 108 नवीनसागरजी महाराज, मुनी धैर्यनंदीजी महाराज, मुनीश्री. उत्कर्षसागरजी महाराज, क्षुल्लक सुकुमालनंदीजी महाराज, क्षुल्लीका मनोमती माताजी, क्षुल्लीका उध्दारमती माताजी, कुंदनश्री माताजी, ब्र. विमलादिदी, कुसुमदिदी यांची उपस्थिीती लाभणार असुन ब्र. सपनादिदी यांच्या मार्गदर्शखाली संपन्न होत आहे.
जंगलातांडा येथे कलाशाकार तीर्थक्षेत्राची निर्मिती
सदर कार्यक्रमासाठी प्रतिष्ठाचार्य पंडीत श्री महावीर जैन गिंगला राजस्थान यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण धार्मिक विधी संपन्न होणार असुन कार्यक्रमासाठी संपुर्ण भारतातून भाविक येणार असुन त्यांच्या निवासाची व भोजनाची संपुर्ण व्यवस्था कलाशाकार तिर्थ करीत आहे. दि. 3 डिसेंबर 2017 रोजी ध्वजारोहणाने कार्यक्रम्राची सुरुवात होणार असुन 6 डिसेंबर गर्भकल्याण, दि.7 डिसेंबर जन्मकल्याण, दि. 8 डिसेंबर तपकल्याण, दि. 9 डिसेंबर ज्ञानकल्याणक, 10 डिसेंबर रोजी मोक्षकल्याणक होणार असुन दि. 6 डिसेंबर रोजी भगवंतांचा 1008 कलशाने अभिषेक होणार आहे. सदर कार्यक्रम प्रसंगी हत्ती, घोडे, उंट, गजरथ, घोडेरथ आदीसह भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला लाभ घेण्याचे केले आवाहन
या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ब्रम्हचारी सपना दिदी तसेच पंचकल्याण समिती अध्यक्ष अनिल कांतीलाल बंडी,मुबंई मंत्री मनोज छाबडा, तोंडापूर, स्वागत समिती सदस्य अनिलकुमार लुहाडीया, सिल्लोड, संदीपकुमार पाटनी सिल्लोड, कार्याध्यक्ष आर. के. जैन मुक्ताईनगर, राजकुमार बाकलीवाल, सिल्लोड, सचिव सतिष साखरे, भुसावळ, संजयकुमार पांडे, सिल्लोड, सहसचिव रमेश अन्नदाते, भुसावळ, अजितकुमार पाटनी, सिल्लोड, जितु जैन, प्रितेश जैन, सागर जैन, राजेंद्र रामदास जैन, पिंपळगांव हरे. सुरेश सैतवाल, जामनेर तसेच सर्व समिती सदस्यांनी केले आहे. सदर कलशाकार तिर्थ हे अजिंठा लेणीपासुन 8 कि,मी अंतरावर फर्दापुर- सोयगांव रोडवर आहे. सदर कार्यक्रमासाठी विविध राज्यातुन सुमारे 25000 भाविक येण्याची संभावना असल्याने कार्यक्रमासाठी विविध समित्यांची नियुक्ती केली असुन तयारी जोमाने सुरु असल्याची माहीती ब्र. सपना दिदी यांनी पत्रकार परिषदेत दिली.