मुंबई: ‘होम मिनिस्टर’ या टीव्ही कार्यक्रमाने घराघरात पोहोचलेले भाऊजी म्हणजेच अभिनेता आदेश बांदेकर यांची पुन्हा एकदा श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. २४ जुलै २०२० पासून तीन वर्षासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांना राज्यमंत्र्याचा दर्जा असतो.