श्री स्वामीनारायण नेत्र रुग्णालयाचा शुभारंभ

0

जळगाव । श्री स्वामीनारायण मंदीर संचलित विमलताई रघुनाथ पाटील नेत्र रूग्णालयाचा शुभारंभ रविवार 30 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता श्री स्वामीनारायण मंदीर दुरदर्शन टि.व्ही. टॉवर शेजारी भुसावळ रोड, जळगाव. स.गु.स्वामी गोंविदप्रसाद दासजी, स.गु.शा. स्वामी नौतम प्रकाशदासजी वडताल, स.गु.शास्त्री पुरूषोत्तमप्रकाशदासजी यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी विविध संतांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती पत्रकार परीषदेत देण्यात आली.

महाविष्णू याग यघज्ञानंतर नेत्र रूग्णालयाचा शुभारंभ
या कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे भव्य महाविष्णू याग यज्ञाचा प्रारंभ 28 एप्रिल दुपारी 4 वाजता होईल. यज्ञ समाप्ती 30 एप्रिल दुपारी 3.30 वाजता होईल. सत्संग सभा 30 एप्रिल रोजी दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत करण्यात आलेले आहे. भारतीय संस्कृतीमध्ये मंदिराचे महत्त्व या विषयावर प्रवचन-स.गु.शा नौतमप्रकाशदासजी, वडताल हे करणार आहेत. गुरूवर्य अ.नि.शा.स्वामी विश्‍वप्रकाशदासजी यांच्या स्मृती अर्थे तसेच भगवान श्री स्वामीनारायण यांच्या आज्ञेनुसार शिक्षापत्री 139 अनुसार ‘रोगार्तस्य मनुष्यस्य यथाशक्तीच माकमकै समाजात दोन प्रकारचे मनुष्य असतात एक गरिब आणि दुसरा धनवान, धनवान सदग्रस्ताची संपत्ती गरिबांच्या सेवेसाठी धडून यावी अशा हेतूने स्वामिनारायन मंदीर द्वारा समाज सेवेचे कार्य (नेत्र रूग्णालय) खास समाजामध्ये मध्यम व गरिब वर्गीय लोक पैशाच्या अभावाने डोळ्याचा उपचार करू शकत नाही, शेवटी दृष्टीहीन होतात. अशा समाजासाठी जनसेवा हीच ईश्‍वर सेवा समजून संपत्तीवान सदग्रस्ताची संपत्ती योग्य मार्गाने समाजासाठी उपयोगी व्हावी. ह्या उद्देशाने हॉस्पिटल उभारले आहे. यात हॉस्पिटल मधील सेवा सर्वांसाठी विनामुल्य राहणार असून या सेवाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. भव्य महा विष्णू याग हा 31 ब्राम्हण यांच्या मंत्रोपचाराने पूजा विधी करणार आहेत.