नवापूर । येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री दत्त जयंतीनिमित्त 26 नोव्हेंबर 4 डिसेंबर दरम्यान अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सुरु झाला आहे. श्री स्वामी समर्थ केंद्रात अखंड सेवा उपक्रम होणार आहेत सप्ताहात सात दिवस अखंड प्रहर सेवा आहे. यात वीणा वादन,श्री स्वामी समर्थ मंत्र माळ जप,श्री स्वामी चरीत्र सारामृत वाचन, यासह विविध प्रकारचा सेवेचा समावेश आहे.सप्ताहातील सेवेमुळे आपल्या जीवनातील दुख संकटे दुर होतात अशी भाविक सेवेकर्यांची श्रध्दा असुन सात दिवस सामुहिक गुरुचरित्र पारायण वाचन होणार आहे. यासाठी शेकडो भाविक पारायण व इतर सेवेत सहभागी झाले आहेत. यासाठी केद्रात व बाहेर मंडपात व्यवस्था करण्यात आली आहे.
भाविकांच्रा समस्रा निवारण कार्रक्रम
सप्ताहात दि 26 नोव्होंबरला ग्रामदेवता निमंत्रण,मंडप मांडणी करण्यात आली. 27 रोजी मंडळ स्थापना व स्थापीत देवता हवन करण्यात आले. 28 रोजी नित्यस्वाहाकार,गणेश याग व मनोबोधक याग दि 29 रोजी नित्य स्वाहाकार स्वामी याग, 3 डिसेंबरला नित्य स्वाहाकार,बली पुर्णहुती व दुपारी 12:39 ला श्री दत्तजन्मोत्सव दि 4 डिसेंबर सोमवार रोजी श्री सत्य दत्त पुजन,महाआरती,नाम जप यज्ञ सांगता होऊन प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. रोज सकाळी आरती संपल्या नंतर मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे समस्या निवारण्याचा करण्यात येणार आहे भाविकांनी सप्ताहाचा लाभ घ्यावा श्री स्वामी समर्थ केद्रा तर्फे करण्यात आले आहे.