पिंपरी : श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान शिवतेजनगर चिंचवड संचालित श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षपदी सौ.मनीषा देव (काकू) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी श्री स्वामी समर्थ महिला मंडळाच्या वतीने माजी अध्यक्षा अर्चना तोंडकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, राजू गुणवंत, हरिनारायण शेळके, संतोष शेळके, मंगेश पाटील, शरण अवसेकर, प्रकाश शिंदे, मधुकर खर्चे, शोभा नलगे, नलिनी खडके, सुनीता दळवी हे उपस्थित होते.