श्रेयच्या राजकारणापेक्षा पाणी महत्त्वाचे

0

शहादा । पीके अण्णा पाटील यांनी दुरदृष्टी ठेवून तापीवरील उपसा योनजा राबविल्या. पाण्याच्या अडचणीमुळे बंद पडलेल्या योजना आता प्रत्यक्षात कायान्वित होणार असल्याने ज्या दिवशी शेतकर्‍यांच्या शेतात या योजनांचे पाणी पोहचेल तो दिवस आनंदाचा असेल या योजनांबाबत श्रेयवादाचे राजकारण न करता शेतकर्‍यांसाठी पाणी महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी केले. सारंगखेडा येथे शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

तांत्रिक बाबींची संपूर्ण माहिती
तापीवरील बंद उपसा योजना सुरू करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला असून कामांना सुरूवात झाली आहे. या योजनांचे काम नियोजन सातपुडा साखर कारखान्याने केले आहे. त्यामुळे सर्व तांत्रिक बाबींचा तपशील काखान्याच्या अभियांत्रिकी विभागाला ज्ञात आहेत. शिवाय योजना सुरू करण्यासाठी कारखान्यामार्फत सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या पार्श्‍वभूमीवर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी सारंखेडा परिसरातील पुसनद कहाटूळ, बिलाडी, टेंंभे, सारंगखेडा येथील सुरू असलेल्या उपसा योजना दुरूस्तीच्या कामचा पाहणी केली. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक मंडळ उपस्थित होते. मधल्या काळात तापी कोरडी पडल्याने योजनाही बंद होत्या, मात्र बॅरेजेस झाल्यानंतर त्या पुन्हा सुरू व्हाव्या यासाठी राज्य सरकारकडे कारखान्याने सातत्याने पाठपुरावा केला. काही अडचणी आल्या, परंतु आज या अडचणी दूर झाल्या असून उपसा योजना दुरूस्तीचे काम सुरू असल्याचे दीपक पाटील यानी सांगितले.