श्रेयस गायकवाड पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेला !

0

जळगाव: जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अर्थात डीआरडीएचे संचालक सुनिल गायकवाड यांचे पुत्र श्रेयस गायकवाड पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाला आहे. अमेरिकेतील ऑस्टिन विद्यापीठात शिक्षणासाठी पदव्युत्तर शिक्षणासाठी त्याची निवड झाली आहे. त्यासाठी त्याला शिष्यवृत्ती देखील मिळाली आहे. अमेरिकेतील संपूर्ण शिक्षण त्याचे शिष्यवृत्तीवर होणार आहे. श्रेयस गायकवाडने बी.टेक (मेकॅनिकल)ची पदवी आयआयटी मुंबई येथून मिळविली आहे. आयआयटीतून बी.टेकची पदवी मिळविणे ही शिक्षणक्षेत्रातील मोठी बाब मानली जाते. श्रेयसने मिळविलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. विविध ठिकाणी त्याचा सत्कार देखील होत आहे.