श्रेयस भावेचे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धत यश

0

चोपडा । येथील विवेकानंद विद्यालयाचा विद्यार्थी श्रेयस नरेंद्र भावे याने जळगांव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ जळगांव आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धत द्वितीय क्रमांक पटकविला. तसेच त्याने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळविले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय पोतदार, माजी अध्यक्ष डॉ .विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनशाम अग्रवाल, सचिव अ‍ॅड. रविंद्र जैन, कार्यवाहक सुधाकर केंगे, विशस्ता मंगला जोशी सह मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी मित्र मैत्रीणींनी त्याचे अभिनंदन केले. मुख्याध्यापक नरेंद्र भावे मुलगा आहे .