पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मालमत्तांचे संरक्षण करण्यासाठी श्वानपथके नियुक्त करण्याचा स्थायीसमितीने संमत केलेला ठराव रद्द करावा अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी शनिवारी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली.
हे देखील वाचा
भापकर यांनी या संदर्भात आयुक्तांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, महापालिका वर्षभरासाठी चार मालमत्तांवर श्वानपथकांची नेमणूक करणार आहे. एक श्वान आणि त्याला हाताळणा्या दोन व्यक्ती अशा चार पथकांवर एक वर्षासाठी 28 लाख 80 हजार रुपये खर्च केला जाणार आहे. स्थायीसमितीने दि.04 जानेवारी रोजी हा विषय संमत केला असून या विषयाला सूचक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गीता मंचरकर असून अनुमोदन राष्ट्रवादीच्याच प्रज्ञा खानोलकर यांनी दिले आहे.
यापूर्वीही पालिकेने हा प्रयोग केला असून त्यावेळी चोरांना पाहून कुत्रे पळून गेल्यामुळे पालिकेने हा प्रयोग बंद केला. मात्र, आता पुन्हा तोच प्रयोग पालिका करू पहात आहे.वाढत्या बेकारीच्या या काळात श्वानपथकावर होणा्या खर्चापेक्षा कमी खर्चात सुरक्षारक्षक मिळणे सहज शक्य असल्याने ते नेमण्यात यावेत व हा प्रस्ताव विखंडित करावा.