अमळनेर । राज्यात गेल्या अनेक वर्षापासनू सततचा दुष्काळ पडण्याला व अनियमित पावसाला एकमेव कारण म्हणजे दिवसेंदिवस नष्ट होत असलेली वनराई असून भविष्यकाळ सुखमय करायचा असेल आणि भविष्यातील संकटाचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार शिरीष चौधरी यांनी केले. अमळनेरला ग्रीन झोन करण्यास खारीचा वाटा उचलावा असे आवाहनही त्यांनी केले. आमदार शिरीष चौधरी व शिरिषदादा मित्र परिवाराच्या वतीने वृक्ष वाटपाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
प्रातिनिधिक स्वरुपात 10 शेतकर्यांना आमदारांच्या हस्ते वृक्ष वाटप करण्यात आले. पिंपळ, वड, निंब, चिंच, बांबू, सुबाबुड, निलगिरी, सीताफळ, गुलमोहर, मोगरा आदी झाडांची रोपे वाटप करण्यात आली. यावेळी श्रीराम चौधरी, पांडुरंग महाजन, नरेंद्र चौधरी, योगराज सदांनशिव, धनंजय महाजन, किरण गोसावी, सुनील भामरे, सुरेंद्र पाटील, रमेश कोळी, जयवंत पाटील, राजेंद्र चौधरी, संतोष लोहरे, सुधीर चौधरी, मनोज शिंगाने, दीपक चौगुले, व शिरीषदादा मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थीत होते.