संकटात निवडणुकीचा विचार कसा येतो?; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

0

मुंबई: कोल्हापूर, सांगली येथे भीषण पूरस्थिती निर्माण झाली होती. जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले होते. राजकीय, सामाजिक क्षेत्रातून मदतीचा ओघ सुरु आहे.पूरग्रस्त बांधवांसाठी आपण पूर्ण ताकदीनिशी उभे राहायला हवे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. संकटकाळी निवडणुकांचा विचार तरी कसा येतो, असा सवाल करत उद्धव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला हाणला. पुराच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुका पुढे ढकला, अशी मागणी राज यांनी केली होती. त्यावर उद्धव यांनी अप्रत्यक्ष भाष्य केले. शिवसेना भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आज दुपारी शिवसाहित्य मदतीचे ट्रक , अॅम्बुलेंस शिवाजी पार्क, दादर येथून सांगली, कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, औषधे, खाण्याचे साहित्य अशी मदत शिवसेनेतर्फे करण्यात येत आहे.