संकल्प आदिवासी युवा जागृती संघटनेची वार्षिक सभा

0

जैताणे । संकल्प आदिवासी युवा जागृती संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवावरी १७ रोजी निजामपूर येथे उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. राहुल गावित होते. संस्थापक चेतन खंबाईत, साक्री तालुकाउपाध्यक्ष देविदास बागुल, सचिव ताराचंद गांगुर्डे यांच्यासह संकल्प कोअर कमिटी सदस्य उपस्थित होते. २०१७-१८ या वर्षामध्ये होणार्‍या विविध उपक्रम कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

धुळे जिल्हा कोअर कमिटीच्या अध्यक्षतेखाली संकल्प आदियुवा जागृती विद्यार्थी संघटना-साक्री तालुक्याची नूतन कार्यकरणीची निवड करण्यात आली. यावेळी कार्यकारीणी जाहीर करण्यात आले. अध्यक्ष- विनित सूर्यवंशी, उपाध्यक्ष- पंकज देशमुख, दिनदयाल बहिरम, सचिव -विजय अहिरे, कोषाध्यक्ष- राहुल बहिरम, प्रसिद्दी प्रमुख-विशाल जगताप यांचा कार्यकारीणीत समोवेश आहे. सर्वानुमते त्यांची निवड करण्यात आली. यावेळी सुरेश गवळी, किशोर कोकणी उपस्थित होेते.