संकल्प सत्यात अवतरण्यासाठी कृतीची जोड असावी

0

हभप शिवदास महाराज : श्री क्षेत्र शिरसाळ्यात कीर्तन सोहळा

बोदवड- मनुष्याच्या मनात आलेल्या कोणत्याही संकल्पाचा दाता साक्षात परमेश्वर असतो. आपण चांगल्या हेतूने व स्वतःच्या व समाजाच्या भल्यासाठी केलेला एखादा संकल्प सत्यात उतरवायचा असेल तर त्याला कृतीची व प्रयत्नांची जोड देण्याची आवश्यकता असते, असे विचार शिवकथा प्रवक्ते, रामायणाचार्य तसेच भागवत धर्म प्रचारक हभप शिवदास महाराज राहणे (खेडी-पान्हेरा, ता.मोताळा) यांनी श्री क्षेत्र शिरसाळा मारोती येथे कीर्तनप्रसंगी केले. निंभोर येथील माजी उपसरपंच व जनसंग्राम बहुजन लोकमंचचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या वतीने नुकताच कीर्तन सोहळा, ऋणनिर्देश व महाप्रसाद कार्यक्रम पार पडला. यावेळी कांडवेल (ता.रावेर) येथील सरपंच,उपसरपंच व ग्रामस्थांच्या वतीने मनिषा व विवेक ठाकरे या दाम्पत्याचा जाहीर सत्कार करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
श्री क्षेत्र शृंगऋषी आश्रमाचे संस्थापक हभप भागवत महाजन, निंभोरा ग्रामपंचायतीचे सदस्य रमेश येवले, प्रा.पुरुषोत्तम गड्डम, बारा बलुतेदार महामंडळाचे चंद्रकांत सोनवणे, प्रकाश बाविस्कर, श्रीक्षेत्र शिरसाळा मारोती संस्थान अध्यक्ष विश्वनाथ पाटील, उपाध्यक्ष सरदारसिंग पाटील, भरतसिंग पाटील, साहेबराव पाटील, कडू पाटील, कांडवेल सरपंच आशा पाटील, उपसरपंच राहुल पाटील, किशोर कचरे, रमेश पाटील, गजानन गिरडे, ज्ञानेश्वर दत्तू पाटील, धनंजय ठाकरे, अरुण ठाकरे, भगवान कोकाटे, अनिल बर्‍हाटे, कैलास येवले, विजय पाटील, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, सुनील कोंडे, प्रा.दिलीप सोनवणे, सागर चौधरी, दस्तगीर खाटीक, किरण सपकाळे, गजानन खोडके, संजय वराडे, बळीराम पाटील, पंढरी कचरे, ज्ञानेश्वर बोरसे, गोपाळ पाटील, शंकर पाटील, अशोक पाटील, देविदास पाटील, काशिनाथ पाटील, तेजराव पाटील, प्रभाकर खर्चे, शंकरराव निंबाळकर, सागर सपके, दीपक पवार आदी प्रमुख म्हणून उपस्थित होते.

यांनी केले सहकार्य
अमृत महारा, देवेंद्र महाराज मारके, सदानंद महाराज, संजय महाराज, सोपान महाराज, मोहन महाराज, आनंदा महाराज गाव, काशीराम महाराज, एकनाथ महाराज, प्रशांत महाराज ,उमेश महाराज, मृदुंग वादक विशाल महाराज आदी कीर्तनकार व असंख्य वारकर्‍यांनी साथसंगत केली. रामकृष्णा बोदडे, संतोष आवारे, संतोष चांदेलकर, संजय बोदोडे, अतुल येवले, नदीम शेख, आकाश बोरसे, ललित पाटील, संदीप मोरे, चंदन मोरे, कुणाल मोरे, हभप.गजानन टेलर्स, गणेश महाले, उमेश पाटील, यश बोदडे, शंकर टोंगे, धीज चौधरी, हर्षल चौधरी, ज्ञानेश्वर उमक, नयन सावळे, हेमंत मगर, कृष्णा कोळी, ईश्वर पाटील, संतोष कांबळे, योगेश पाटील, उमेश पाटील आदींनी परीश्रम घेतले.