जळगाव: भारत निवडणूक आयोगामार्फत सद्यस्थितीत सुरु असलेल्या 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाबात विभागीय आयुक्त, नाशिक तथा मतदार यादी निरीक्षक राजाराम माने हे जळगाव जिल्हयातील मा. संसद सदस्य, मा. विधीमंडळ सदस्य, मान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष / सचिव, लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष व पंचायत समिती सभापती यांचे समवेत शुक्रवार 28 सप्टेंबर 2018 रोजी दुपारी 12.15 वाजता जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हयातील संसद सदस्य, विधीमंडळ सदस्य तसेच मान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष / सचिव, लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष व पंचायत समिती सभापती यांना सदर बैठकीस उपस्थित राहणेबाबत आवाहन करण्यात येत आहे. असे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.