संगिता जोगदंड यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

0

मानवाधिकारदिनानिमित्त राबविला उपक्रम

नवी सांगवी : मानवधिकार कार्यकर्त्या संगिता जोगदंड यांना जागतिक मानवधिकार दिनानिमित्त राज्यस्थान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. ए.डी.सावंत व कायदेतज्ज्ञ अ‍ॅड.असीम सऱोदे, सुभाष वारे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती स्क्रीनवर दाखवण्यात आली. यावेळी जोगदंड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, मी आजवर मी वेगवेगळ्या जनजागृती, पथनाट्य व वंचितांसाठी काम केले आहे. या कामाची दखल या संस्थेने घेऊन मला हा पुरस्कार प्रदान केला. याचा मला आनंद तर झाला यापूढेही मी आधिक जोमाने कार्य करत राहील. माझे पती आन्ना ज़ोगदंड यांच्या सामाजिक कामामुळेच मला प्रेरणा मिळाली.

सतरा वर्षात अमंलबजावणी नाही

संचालक आन्ना जोगदंड यांनी सांगितले की, प्रत्येक जिल्हास्तरावर विशेष मानवी हक्क न्यायालय, असावे अशी शासनाने 30 मे 2001मध्ये कायद्यात तरतूद केली आहे. परंतु 17 वर्षांत अमंलबजावणी झाली नाही म्हणून रॅली काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर राज्यस्तरीय पुरस्कार कतारसिंग (पंजाब), सूमन जांभुळकर, पोलीस उपनिरीक्षक वसंत साबळे (राष्ट्रपती पुरस्कारार्थि), सुनील सवाशे (पत्रकारिता), डॉ. आभिषेक हरीदास(शैक्षणिक) आदींनाही गौरविण्यात आले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर, राष्ट्रीय सचिव सोमनाथ सावंत, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतिश लालबिगे, महाराष्ट्र प्रदेश कायदेशीर सल्लागार अध्यक्ष अ‍ॅड.सचिन झालटे, मुख्य सल्लागार अनिल कदम, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष धनरासिंग चौधरी, उपाध्यक्ष विकास शहाणे, महिला अध्यक्षा किर्ती जाधव, गुलशन नायकुडे, संघटन सचिव गजानन धाराशीवकर, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, महेश भागवत, एस.डी.विभुते, राजश्री गागरे, नियाज शेख, ठाणे जिल्हा अध्यक्ष शकील शेख आदी उपस्थित होते.