मुंबई । स्वर्गीय संगीतकार नंदू होनप यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी म्हणजेच 18 सप्टेंबर 2017 रोजी ‘सारे संगीतकार’ या ऐतिहासिक गाण्याचा जन्म होतोय. आपल्या वडिलांना या गाण्याच्या माध्यमातून सुरांजली अर्पण करावी असा मानस नंदू होनप यांचे सुपुत्र स्वरूप नंदू होनप यांचा आहे. यानिमित्ताने एक अनोखी संकल्पना घेऊन ते एक अभिनव कलाकृती संगीतकाराच्या भूमिकेतून रसिकांसाठी सादर करणार आहेत.या गाण्याचे गीतकार आदित्य दवणे हे सुप्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांचे सुपुत्र असून स्वरूप नंदू होनप यांच्यासह ते देखील गीतकाराच्या रूपाने प्रथमच संगीतसृष्टीत पदार्पण करत आहेत.