बोदवड । औरंगाबाद येथे टि सिरीज म्युझिक कंपनीतर्फे आयोजित महाराष्ट्र टॅलेंट सर्च इन म्युझिक असोसिएशन प्रेझेंट ऑडीट्युशनद्वारे जिल्हास्तरीय 15 वर्षे वयोगटातील संगीत प्रतियोगिता स्पर्धेत जैन इंटरनॅशनल स्कुलचा विद्यार्थी अनिकेत मधुकर पाटील (रा. मनुर खुर्द, ता. बोदवड) याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. टि सिरीज म्युझिक कंपनीने 15 वर्षे वयोगटासाठी प्रत्येक जिल्ह्यातून 6 विद्यार्थ्यांना प्रतियोगितेत नामांकित केले होते.
क्लासिकल सिंगिंगसाठी मोफत संधी दिली जाणार
अनिकेत पाटील याने ‘एक व्हिलन’ या चित्रपटातील ‘पल दो पल कि क्यु है जिंदगी । इस प्यार को सदिया काफी है’ हे अरजितसिंग यांनी गायिलेल्या गीतावर परफॉर्मन्स सादर केला होता. जळगाव जिल्ह्यातील 6 विद्यार्थ्यांपैकी अनिकेत पाटील याने प्रथम क्रमांंक मिळविला आहे. टि सिरीज म्युझिक कंपनीने प्रथम क्रमांक विजेत्यांना 10 दिवस फिल्मसिटीमध्ये मोफत प्रवेश, टि सिरीजद्वारा अल्बम लाँच करण्याची मोफत संधी, सर्टिफिकेट ऑफ एक्स्पर्ट इन क्लासिकल सिंगिंगसाठी मोफत संधी दिली जाणार आहे. या यशाबद्दल अनिकेत पाटीलला अरजितसिंग, दिव्याकुमार व टि सिरीज कंपनीचे सीईओ ओवर हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रतियोगितेचे निरीक्षक म्हणून पार्श्वगायक अरजितसिंग, पार्श्वगायिका श्रेया घोषाल आणि पलाश मुच्छल, म्युझिक असोसिएशनचे गणेश गांगुली हे प्रमुख होेते.
मनुर वासियांनी केले कौतुक
यशाबद्दल जैन इंटरनॅशनलच्या प्राचार्या फिरोजा खान, सचिव मनोजकुमार कावडीया, तुषार पाटील, एकनाथ पाटील, सचिन सपकाळ, नितीन राजपूत, नितीन वानखेडे, योगेश बाविस्कर, मेघा रेंगे, विलास झोपे आदींनी अभिनंदन केले. प्रतियोगितेचे आयोजन महाराष्ट्र टॅलेंट सर्च इन म्युझिक असोसिएशन महाराष्ट्र राज्य मुंबईचे सीईओ गणेश गांगुली यांनी स्वराक्षी गार्डन अॅन्ड कॉन्सर्ट हॉल डॉल्फिन रेकॉर्डींग स्टुडिओ औरंगाबाद येथे 23 रोजी करण्यात आले होते. मनुरच्या नागरिकांनीसुध्दा अनिकेतचे अभिनंदन केले आहे.