चाळीसगाव । प्रत्येक प्रांताला ऐतिहासिक वारसा व प्राचिन संस्कृती लाभली आहे. चाळीसगाव च्या पाटणादेवी जंगलात भास्करचार्यानी शून्याचा शोध लावला तेथे कधीकाळी विद्यापीठ होते यावर तुमचा विश्वास बसणार नाही तर जगप्रसिद्ध छायाचित्रकार केकीमुस यांनी आपल्या चित्रातून शहराला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करून दिली त्यांचा नावाने असलेले वस्तुसंग्रहालय पाहून थक्क झालो मात्र अशी संग्रहालये हा वारसा जोपर्यत समाजाची आहेत हे पटवून देण्यात संस्था पुढाकार घेणार नाही तोपर्यत हा इतिहास असाच इतिहासजमा होऊन जाईल याकरिता संग्रहालयांनी लोकांसाठी लोकांपर्यत पोहचण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करावेत असे परखड मत इतिहाससंशोधक तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे प्रमुख भुजंगराव बोबडे यांनी कला महर्षी केकीमुस कलादालनात आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मांडले. रावेळी ट्रस्टचे अध्यक्ष भिकनराव गायकवाड व सचिव कमलाकर सामंत ,चंद्रशेखर पाटील (जळगांव) यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पस्तीस हजार संग्रहालये
यावेळी सचिव कमलाकर सामंत यांनी प्रमुख अतिथी भुजंगराव बोबडे यांना कला दालनातिल बाबूजीच्या दुर्मिळ वस्तुसंग्रहालय व जागतिक पारितोषिक चित्रांचा परिचय करून दिला यानंतर झालेल्या कार्यक्रमात भुजंगराव बोबडे यांनी उपस्थितांशी संवाद साधला ते पुढे म्हणाले की देशात पस्तीस हजार संग्रहालये आहेत त्यात आंतरराष्ट्रीय तर राज्य पातळीवरील संग्रहालये आहेत आपल्या परिसराचा इतिहास, पुरातन संस्कृती, रूढी परंपरा अभिज्ञात व्हाव्यात आणि इतिहासकालीन वस्तूंचा ठेवा जतन व्हावा या उद्देशाने संग्रहालये निर्माण झाली मात्र हा इतिहास बघण्यासाठी व त्यावर आणखीन संशोधन करण्यासाठी नव्या पिढीत रुची नाही ही खेदाची बाब आहे. मात्र येत्या काळात जास्तीतजास्त विद्यार्थी व तरुण पिढीला हा इतिहास कळवा यासाठी वस्तुसंग्रहालयांना च प्रयत्न करावे लागतील असे सांगून ते म्हणाले की अनेकदा इतिहासकार ही चुकीचा व काल्पनिक इतिहास जनतेसमोर आणतात मात्र खरा इतिहास हा संशोधकाने पुराव्याचा आधार घेऊनच समाजासमोर आणावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दुर्मिळ इतिहास संपदा
आपल्या ओघवत्या शैलीत सुमारे दीड तास त्यांनी पाटणादेवी बहाल टेकवाडे तसेच खान्देश सह देशातील विविध राज्यातील इतिहासात त्यांनी केलेल्या संशोधन कार्याचा परिचय करून दिला आपल्या दुर्मिळ इतिहास संपदा उपस्थितांसमोर उलगडला यात प्रामुख्याने भास्कराचार्य यांनी लिहिलेला बिजगणित लीलावती हस्तलिखित ग्रंथ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचा भारतातील पहिला हस्तलिखित ग्रंथ,छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात लिहिलेले शेवटचे सप्टेंबर 1679 मधील पत्र,सोन्याच्या शाईने लिहिलेला कुराणग्रंथ , ह्या कुराणाच्या ज्याच्या जगात चारच प्रति आहेत त्यापैकी ही एक प्रत आहे. ,1000 वर्षांपूर्वी जेव्हा आपल्या देशात कागद नव्हता तेव्हा ताडाच्या झाडाच्या पानांवर लिहिलेले ग्रंथ व पेंटिंगस, 3700 वर्षांपूर्वी चे पुरातत्वीय अवशेष, मौर्य कालखंड ते आधुनिक काळातील नाणी,सात हजार फरमाने, एकशे एकोनचालीस देशांची बेचाळीस हजार पोस्टल तिकिटे , असा अनेक दुर्मिळ ठेवा त्यांनी दाखविला यावेळी त्यांनी लिहलेल्या सहा संशोधन ग्रंथांची ओळख त्यांनी करून दिली.
जनशक्तीच्या विशेष पानाचे कौतुक
कार्यक्रमात संस्थेचे सचिव कमलाकर सामंत यांनी भुजंगराव बोबडे हे वन मॅन युनिव्हर्सिटी असल्याचे सांगून त्यांनी लिहलेल्या विशेष लेखांचे जनशक्ती ने दिलेल्या प्रसिद्धी चे कौतुक केले अतिशय आशयपूर्ण माहितीचे आजचे विशेष पान संग्रही ठेवण्यासारखे असल्याचे गौरवोद्गार काढले तर अध्यक्ष भिकणराव गायकवाड यांनी बोबडेच्या अचाट बुद्धिमत्ताने आपण भारावलो असून आमचे कलादालनला भविष्यात त्यांच्या सल्ल्याची गरज पडणार असल्याची आशा व्यक्त केली कार्यक्रम आटोपल्यावर ही जनशक्तिमधील लेखाचे विद्यार्थी वाचन करताना दिसत होते यावेळी महिलांची देखील मोठी उपस्थिती होती कार्यक्रमाचे यशस्वीते साठी व्यवस्थापक मनोज घाटे व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.