संघटना बांधणीसाठी कॉंग्रेसने घेतली कडक भूमिका

0
पुणे : पक्षाची बांधणी करून लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचे धोरण पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी आखले असून वरिष्ठ नेत्यांनी याकरिता सर्व पदाधिकाऱ्यांवर दबाव वाढविला आहे.
काँग्रेस पक्षात गेल्या काही वर्षात नेत्यांची मनमानी , गटबाजी आणि बेशिस्त बोकाळली. त्यातून पक्ष संघटना विस्कळीत झाली होती. शिस्तबद्ध भाजपसमोर काँग्रेस या कारणाने पराभूत होत गेली. राहुल गांधी यांनी मात्र संघटना बांधणीवर भर दिला आहे. यात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात बूथ कमिट्या नेमण्यावर भर दिला आहे. पक्षाच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने सांगितले की, संघटना बांधणीत कोण नेते सहभागी आहेत, बूथ कमिटी कोण करित आहे ,ब्लॉक अध्यक्ष हा पक्षातील महत्वाचा घटक आहे, हा अध्यक्ष सक्रीय आहे की नाही आणि लोकसभेसाठी इच्छुक असणारे संघटना बांधणीत किती प्रमाणात सहभागी आहेत याची तपशीलवार माहिती गोळा केली जात आहे. लोकसभेची उमेदवारी देताना या माहितीचा आधार घेतला जाणार आहे. संघटना बांधणीत तडजोड नाही असे कडक धोरण आखले आहे. यापुढे मतदार आणि पक्ष यांना गृहित धरून नेतेगिरी करणाऱ्यांना पक्षात वाव नाही, असेही पदाधिकाऱ्याने स्पष्टपणे सांगितले.