संघटनेची मदत पाहून मयत कुटुंबाचे डोळे पाणावले

0

नवापूर । येथील मरत शिक्षक जुंझाऱ्या चौधरी यांच्या कुटूंबिरांसाठी सोशल मीडिराद्वारे केलेल्या आवाहनास कर्मचारी बंधूंनी प्रतिसाद देऊन निधी गोळा केल्याने मरत कुटुंबाचे डोळे पाणावले. मागील वर्षी डिसेंबर 2017 या महिन्यात नवापुर तालुक्यातील डीसीपीएस धारक शिक्षक जुंझार्‍या गुरा चौधरी हे तब्ब्येत बरी नसल्याने दुर्धर आजाराने मयत झाले होते. चौधरी हे डीसीपीएस धारक या अन्यायकारक योजनेची लाभार्थी असल्याने त्यांच्या मागे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले

असे केले मदतीचे आवाहन
राज्य जुनी पेंशन हक्क संघटन मार्फत संदिप रायते यांनी आवाहन केले. सोशल मिडीयावर देखील त्यांनी पोष्ट टाकली. एकूण 50,000 रुपये चा निधी गोळा झाला. दवाखाना तसेच उर्वरित रक्कम त्यांच्या घरी गणोर येथे त्यांच्या पत्नी मिनाताई यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. फुल ना फुलाची पाकळी म्हणुन केलेली मदत त्या कुटुंबात आज एक छोटेसे सुवासिक म्हणुन दरवळले. जिल्हाध्यक्ष संदिप रायते कार्याध्यक्ष अशोक बागले, जिल्हा संघटक विशाल सिसोदे, तालुका उपाध्यक्ष आबासाहेब अहिरे उपस्थित होते…सदर निधी जमा करणे साठी पंकज होडगर, प्रविण पगारे, अमोल पाटील, पवन निकुम, दयानंद जाधव, प्रविण परदेशी, अभिषेक काकड, हिकमत बोडखे, वाघांबर कदम, दादाभाई पिंपळे तसेच जिल्हा व तालुका कार्यकारीणी आदींनी मोलाचे सहकार्य केले.अशी माहिती संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख हेमंत पाटील यांनी दिली.