संघटनेतील दूषित वातावरणामुळे अलिप्त-संजय गरुड

0

जामनेर ।जर एखाद्याकडे विपुल प्रमाणात साधन संपत्ती उपलब्ध असेल आणि त्याचा वापर पक्षवाढी साठी केला जात असेल तर तसा प्रयत्न कुणी का करू नये ? मी सोशल मीडियावरीलल पेव फुटलेल्या गटबाजीच्या पूर्णपणे विरोधात असून केवळ पक्षाच चिन्ह घराघरात पोहचाव या करीता तत्पर आहे, असे वकत्व्य राष्ट्रवादीचे युवा नेते अभिषेक पाटील यांनी केले. शहर व तालूका कार्यकारणी करीता जिल्हाध्यक्ष ललीत बागुल यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत पाटील बोलत होते. संघटनेतील वातावरण दूषित झाले असून या कारणामुळे मी अलिप्त असल्याचे ज्येष्ठ नेते संजय गरूड यांनी यावेळी स्पष्ट केले.

पक्षाचा पुरोगामी विचार महत्त्वाचा
जेष्ठ नेते संजय गरुड म्हणाले की, सोशल मिडीयावर तथा कथितांकडून नेतृत्वाबद्दल सुरु असलेल्या दिशाहीन प्रचारामुळे संघटनेतील वातावरण दूषित झालेले असल्याने मी सध्या अलीप्त राहण्याची भूमिका स्वीकारली आहे. आमदार, खासदार होण्याचे स्वप्न पाहण्यापेक्षा पक्षाचा पुरोगामी विचार महत्वाचा आहे. तो जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करावा आपसात गटबाजी करून काहिही निष्पन्न होणार नाही, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. मोदी-फडणवीस सरकारवरही त्यांनी यावेळी टीका केली. पदाधिकारी निवड प्रक्रियेत शैलेश पाटील, अर्जुन पाटील, अण्णा चौधरी, निलेश साबळे, किरण ढगे, नसीम शेख, प्रशांत सुरवाडे, कृष्णा माळी, पराग नेरकर, दत्ता नेरकर यांनी इच्छुक म्हणून आपला परिचय दिला.

तर तात्काळ त्यांना बाहेर काढावा
बैठकीच्या सुरुवातीला सोशल मिडीयावरील गटबाजीचा धागा पकडत काही उत्साही कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असता बागुल यांनी वेळीच हस्तक्षेप करत विवादीत मुद्द्याला धरून जर कुणी पक्षां अंतर्गत गटबाजीला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या लोकांनी पक्षातून तात्काळ बाहेर पडावे असा सुचना केल्या.याला अनुमोदन म्हणून तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी कथीत कार्यकर्त्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला.यावेळी मंचावर डि. के. पाटील.दगडू पाटील, युनुस पठाण भगवान पाटील, प्रदीप लोढा, अँड.ज्ञानेश्‍वर बोरसे, अनिल बोहरा, जावेद मुल्लाजी यांच्यासोबत इतर मान्यवर व उपस्थितांमधे तालूका पदाधिकारी हजर होते. ज्ञात असो की गेल्या पधरवाड्यापासून सोशल मीडियावर अभिषेक पाटील यांच्या समर्थनात वेगवेगळ्या समुह चर्चातून नेतृत्व परिवर्तनाचे पर्व सुरु करण्यात आले आहे. त्याचेच पडसाद आजच्या पक्ष बैठकीत उमटले.