शहादा। कार्यकर्ता सामाजिक संघटना एकत्रित काम केले तरच सामुहिक नेतृत्वामुळे लोकप्रतिनिधीचा विजय निश्चित होतो. भाजपा हा पक्ष नसून संघटना मजबूत करणारा घटक असल्याचे प्रतिपादन आमदार उदेसिंग पाडवी यांनी कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्म शताब्दी महोत्सवनिमित्त शहादा शहर भारतीय जनता पक्षाच्यावतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन तैलिक मंगल कार्यालयात संपन्न झाला. यावेळी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, भाजपा विस्तार पर्यवेक्षक डॉ. शशिकांत वाणी, तालुका अध्यक्ष डॉ. किशोर पाटील, शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाळे, जिल्हा सरचिटणीस दिनेश खंडेलवाल, प्रा. विलास डामरे, नगरसेविका रिमा पवार, नगरसेवक प्रशांत निकुम, रियाज कुरेशी, इकबाल पिंजारी, कल्पना पंड्या, विजय परदेशी मनोज चौधरी, चंद्रकांत पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत पक्षाची सत्ता
आ.पाडवी यांनी म्हटले की, गल्ली पासून दिल्ली पर्यंत पक्षाची सत्ता स्थापनेसाठी कार्यकत्यांनी केलेल्या मेहनतीने विजय प्राप्त करून दिला आहे. या सर्व कार्यकर्त्यांचा विचारांची देवाण घेवाणसाठी व्यापक मेळावा आहे. गेल्या तीन वर्षात राज्य शासनाने लोकनियुक्त नगराध्यक्ष, सरपंच तसेच कर्ज माफी यासह सक्षम निर्णय घेतले आहे. 70 वर्षात प्रथम नगराध्यक्ष भाजपा कडे आले. पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या अंगातील पदाची गरिमा उतरवण्याची शक्ती कार्यकत्यांमध्ये व संघटनेत असते. राज्यात सुरुवतीस फक्त 85 आमदार भाजपाचे होते.
संघटन व पक्षाचे काम करण्याचा उत्साह यावा
प्रास्ताविक करतांना शहराध्यक्ष जितेंद्र जमदाळे म्हणाले की, कार्यकर्त्यांमध्ये संघटन व पक्षाचे काम करण्याचा उत्साह यावा म्हणून व्यापक कार्कर्ता मेळावा घेतला पाहिजे. या मेळाव्यापासून प्रत्येकाने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा. नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी म्हटले की, पालिकेत कर्मचारी संख्याबळ कमी आहे. त्यामुळे विकास आराखडा मंजूर करण्यासाठी अडचणी येत आहे. शहर विकासासाठी 13 ते 14 कोटी रुपयांचा निधी पालिका फंडात येवून पडला आहे. शहराचा विकासाचे आश्वासनाची पूर्तता केली तरच येत्या निवडणुकीत भाजपा मतदार पर्यंत पोहचणार आहे. डॉ. शशिकांत वाणी यांनी म्हटले की, संघटनेच्या बळावर येणार्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार आहे. शहादा विधानसभेच्या आ. उदेसिंग पाडवी यांनी तीन वर्षात मतदार संघात अनेक कामे केल्याने शहादा पालिकेवर भाजपा ध्वज फडकला आहे. पक्ष संघटनासाठी व भक्कम होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा.
मोदीच्या विकासाच्या नावावर विजयी
पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या विकासाच्या नावावर विजयी झाले. जो पक्षाचे काम करणार पक्ष व पक्ष श्रेष्ठी त्यास तारणार आहे. केंद्र शासनाच्या विविध योजनांमुळे व विकास उपयोगी निर्णयामुळे पक्षाला एक शक्ती मिळाली आहे. संघटनेचे काम केल्यास जनता त्यांच्या पाठीशी असते. गाव पातळीवर संघटनेचे काम मजबूत असेल तर पक्ष मजबूत होतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश मराठे तर आभार जितेंद्र जमदाळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी जयेश देसाई, विनोद जैन, हितेंद्र वर्मा, के.एम.पाटील, गणेश पाटील, खुशाल न्हावी, घनश्याम देवरे, हेमराज पवार, उमेश पाटील, यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहे.