संघर्ष टाळण्यासाठी जिल्हा बँकेत पुन्हा सर्वपक्षिय पॅनलचा पॅटर्न

पालकमंत्र्यांसह आमदार चिमणरावांची आमदार महाजन, माजी मंत्री खडसेंशी चर्चा

जळगाव – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर स्थानिक पातळीवरही समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. आगामी काळात होणार्‍या निवडणूकांमध्ये त्याचे प्रतिबींब नक्कीच उमटणार आहे. असे असले तरी सहकारात मात्र संघर्ष टाळण्यासाठी पुन्हा एकदा सर्वपक्षिय पॅनल पॅटर्नची अंमलबजावणी करण्याचे राजकीय प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह शिवसेना नेते आमदार चिमणराव पाटील यांनी आज राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह भाजपाचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट घेऊन पॅनलबाबत चर्चा केली.