संघर्ष यात्रेसंदर्भात घेतली आढावा बैठक

0

भुसावळ। राज्यात शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळण्यासाठी काढण्यात येणार्‍या संघर्ष यात्रेसंदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीआरपी व इतर विरोधी पक्षांची संयुक्त बैठक शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली. राज्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळण्यासाठी विरोधी पक्षाचे नेेते राधाकृष्ण विखेपाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेे धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, अशोक चव्हाण, सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही संघर्ष यात्रा जळगाव जिल्ह्यात वरणगाव येथे सायंकाळी 6 वाजता येवून जाहिर सभा घेण्यात येणार आहे.

बैठकीत यांची होती उपस्थिती
यासंदर्भात बैठकीमध्ये नियोजन करण्यात आले. यावेळी पीआरपी जिल्हाध्यक्ष जयवंत सोनवणे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील, माजी सभापती राजेंद्र चौधरी, वरणगाव पालिका गटनेते राजेंद्र चौधरी, काँग्रेसचे प्रदेश सचिव योगेंद्रसिंग पाटील, उमेश नेमाडे, पंकज पाटील, रविंद्र निकम, शेख पापा शेख कालू आदी उपस्थित होते.