मुंबई : बीसीसीआयने आयपीएलच्या दहाव्या मोसमाचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर केले आहे. आयपीएल 2017 मधील पहिला सामना 5 एप्रिल रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. तर लीगचा अंतिम सामना याच स्टेडियममध्ये 21 मे रोजी होईल. परंतु आयपीएलमध्ये सामील होणारे अनेक परदेशी क्रिकेटपटू संपूर्ण स्पर्धेत खेळू शकणार नाहीत. हे खेळाडू ही स्पर्धा मध्येच सोडून जाऊ शकतात. यासबंधी सूचना खेळाडूंनी आपापल्या संघांना दिल्या आहेत.
खेळाडू मायदेशी परतणार
आपल्या राष्ट्रीय संघाचे सामने असल्यामुळे खेळाडू मायदेशी परतणार आहेत. या खेळाडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स, इंग्लंडचा जॉस बटलर या खेळाडूंचा समावेश आहे. खेळाडूंनीही याबाबत आपापल्या संघांना माहिती दिली आहे. दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू 7 मे नंतर स्पर्धेत खेळू शकणार नाहीत. तर इंग्लंडचे खेळाडू 1 मे आणि 14 मे नंतर आयपीएलमध्ये खेळणार नाहीत. हे सर्व खेळाडू त्यांच्या राष्ट्रीय संघात खेळण्यासाठी मायदेशी परतणार आहेत.
हे खेळाडू मध्येच सोडणार साथ
एबी डिव्हिलिअर्स – दक्षिण आफ्रिका (रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर), फाफ डू प्लेसिस – दक्षिण आफ्रिका (रायझिंग पुणे सुपरजायंट्स), जेपी ड्युमिनी – दक्षिण आफ्रिका (दिल्ली डेअरडेव्हिल्स), क्विंटन डी कॉक – दक्षिण आफ्रिका (दिल्ली डेयरडेविल्स), ख्रिस मॉरिस – दक्षिण आफ्रिका (दिल्ली डेअरडेव्हिल्स), जॉस बटलर – इंग्लंड (मुंबई इंडियन्स), सॅम बिलिंग्स – इंग्लंड (दिल्ली डेयरडेविल्स) हे खेळाडू मध्येच स्पर्धा सोडून जाऊ शकतात.