देहराडून : उत्तराखंडमध्ये निर्विवाद बहुमत प्राप्त करणार्या भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार, या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. पक्ष आमदारांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत विधिमंडळ पक्षनेतेपदी त्रिवेंद्रसिंह रावत यांची निवड करण्यात आली असून, शनिवारी ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 57 वर्षीय रावत यांनी काँग्रेसच्या हिरासिंह बिश्त यांचा डोईवाला मतदारसंघात 24 हजार मतांनी पराभव केला आहे. या मतदारसंघातून ते सलग तिसर्यांदा निवडून आले आहेत. रावत हे ठाकूर समाजाचे नेते असून, रा. स्व. संघाशी असलेल्या जवळकीमुळे ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे होते. 1983 ते 2002 पर्यंत ते संघाचे पूर्णवेळ प्रचारक होते. तसेच, संघाच्या विविध पदांवरील जबाबदार्याही त्यांनी सांभाळलेल्या आहेत.
शपथविधीला मोदी उपस्थित राहणार
त्रिवेंद्रसिंह रावत यांनी पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण केले असून, 2014 मध्ये ते उत्तराखंडमध्ये भाजपचे निवडणूक प्रमुख होते. पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे निकटवर्तीय म्हणूनही रावत यांना ओळखले जाते. झारखंडमध्ये पक्षाचे संपर्कप्रमुख असताना त्यांनी तेथील विधानसभेतही भाजपला नेत्रदीपक यश मिळवून दिले होते. आता उत्तराखंडमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले असून, 70 पैकी 57 जागा जिंकल्या आहेत. तसेच, पक्षाला तब्बल 46.50 टक्के मते मिळालेली आहेत. आता शनिवारी (दि. 18) दुपारी 3 वाजता नव्रा सरकारचा शपथग्रहण समारंभ पार पडणार आहे. रा शपथविधी सोहळ्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्रक्ष अमित शाहसह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.