संघाची कामगिरी उंचावली पाहिजे!

0

मुंबई। कुंबळे व कोहली यांच्या वादामुळे कुंबळे याने मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला.त्यानंतर कर्णधार विराट कोहलीवर दबाव वाढला आहेप्रसारमाध्यामध्ये कुंबळे विरूध्द कोहली असा वाद रंगला होता. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कर्णधार कोेहलीला तंबीच दिली आहे.कुंबळे यानीं मुख्यप्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यानंतर जर संघाची कामगिरी चांगली झाली पाहिजे जर ती तशी झाली नाही त्याला पूर्णपणे जबाबदारी कोहलीवर असेल,याचबरोबर कामगिरी उंचावली नाही तर कर्णधार पद सोडावे लागे असे बीसीसीआयने कोहलीला सांगितल्याचे एका पदाधिकार्‍याने सांगितले आहे.दुसरीकडे दोघामधील वाद इतका टोकाला गेला होता की, कुंबळे पदाचा राजीनाम दिला नसता तर कोहली कर्णधार पदाचा राजीनाम देण्याच्या विचारात होता.

अधिकार्‍यांनी व्यक्त केली चिंता
क्रिकेट सल्लागार समितीचे सचिन तेंडूलकर ,सौरव गांगुली, लक्ष्मण यांची बीसीसीआयच्या अधिकार्‍यामध्ये बैठक झाली होती.यात मुख्य प्रशिक्षक कुंबळेवर विश्‍वास नाही असे विराट आपले म्हणणे मांडले होते. कुंबळेवर दबाव वाढवला तरच त्याच्यासोबत काम करण्यास मी तयार आहे, असे कोहलीने या बैठकीत सांगितले होते.तर अनिल कुंबळेने यांनी सल्लागार समितीला सांगितले की, विराट कोहलीसोबत कोणताही वाद नाही. विराटसोबत काम करण्यास कोणतीही अडचण नाही.त्यानंतर सल्लागार समितीने हे सर्व प्रकरण प्रशासकीय समितीसमोर ठेवले.अधिकार्‍यांनीही या वादामुळे चिंता व्यक्त केली होती. प्रशिक्षक व खेळाडू याच्या वाद असाच राहिला तर परिस्थिती आणखी बिकट होईल, असे त्यांना वाटत होेते. असे असूनही प्रशासकीय समितीने अनिल कुंबळेने प्रशिक्षकपदी राहावे, असा सल्ला दिला होता. पण कोहलीसोबतची भागिदारी पुढे शक्य नाही, असे सांगुन कुंबळेने आपल्या पदाचा राजीनामा दिला.

कुंबळेच्या राजीनाम्यावर कोहली ठाम
मुख्य प्रशिक्षक कुंबळे यांनी राजीनामा द्यावा यावर विराट कोहली ठाम होता. लवकरात लवकर बीसीसीआयने कुंबळेंचा उत्तराधिकारी शोधावा असे कोहलीचे मत होते. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय, बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी कोहलीने याविषयावर चर्चाही केल्याचे कळते. या पलिकडे जाऊनही जर बीसीसीआयने सचिन,गांगुली आणि लक्ष्मण या सल्लागार समितीच्या सदस्याचे मत ग्राह्य धरले असते तर कोहली कर्णधार पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत होता. सल्लागार समितीने केलेल्या मध्यस्थीनंतरही दोघांमधले संबंध काही केल्या सुधारण्याचे नाव घेत नव्हते. दोघांमधले संबंध सुधारले जातील या आशेवर सल्लागार समितीने कुंबळेंना वेस्ट इंडिज दौर्‍यापर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाला आणि हा वाद आणखीन उफाळून वर आला.