जळगाव । कन्नूर जिल्ह्यात रा. स्व संघाच्या व भाजपच्या कार्यकर्त्यांवर, व त्यांच्या घरावर माक्सवादी कम्युनिस्ट कार्यकर्त्याकडून सतत होत असलेले हल्ले, त्यांचा होत असलेल्या निर्घृण हत्या या कडे लक्ष वेधण्यासाठी आज राष्ट्रीय सुरक्षा मंच यांच्या वतीने जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला. केरळमध्ये विशेष म्हणजे डाव्यांच्या हातात सत्ता गेल्याने हिंसक असल्याच्या घटना मध्ये वाढ झाली आहे. या बाबत राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या वतीने महामहिम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पत्र देण्यात आले आहे. यावेळी शहरातील उपस्थित मान्यवरांनी भाषणे व निवेदन देऊन निषेध केला. आमदार हरिभाऊ जावळे, आमदार राजू भोळे, आमदार चंदू पटेल, आमदार स्मिता वाघ, सचिन नारळे, राजेश पाटील, अनिल सोनावणे, सुनील भंगाळे, किशोर चौधरी, दीपक घाणेकर, सुधा खटोड, रेवती शेंदुर्णीकर, अपर्णा महाशब्दे, वीरेश पवार यांची उपस्थिती होती.
संघ, भाजपाच्या दहा हजार कार्यकर्त्याची हत्या
गृह खाते सांभाळत असलेल्या केरळच्या मुख्यमंत्र्याना रा. स्व संघ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी विनंती केली कि त्यांनी कन्नूर ला भेटी द्यावी. शांतता समितीच्या बैठका घेऊन मतदार संघातील आणि कन्नूर जिल्ह्यातील तसेच अन्य भागातील राजकीय हेतून प्रेरीत हल्ले थांबविण्यासाठी आवाहन करावे. मात्र या बाबत ठोस पावले उचलली गेली नसल्याची खंत या वेळी उपस्थिती आंदोलकांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रपती ना दिलेल्या पत्रकात संघ आणि भाजपच्या एकूण दहा हजार कार्यटकर्त्याचा हत्या झाल्या असल्याचा खुलासा राष्ट्रीय सुरक्षा मंच च्या वतीने करण्यात आला आहे. झालेल्या हल्ल्या मध्ये आज हि जखमी च संख्या अधिक आहे. केरळ मधील पोलिसांच्या पक्षपाती दृष्टिकोनामुळे परिस्थिती बिघडत चालली आहे. संघ आणि भाजपच्या अनेक निरपराध कार्यकर्त्यांना पकडून त्यांच्या विरोधात खोट्या तक्रारी नोंदविल्या जात असून केरळ मध्ये अनेक वेळा माक्सवादी कम्युनिस्ट च्या कार्यकर्त्यां कडून पोलिसांवर देखील हल्ले होत असल्याचे पत्रकात म्हटले आहे. लोकशाहीर कार्यरत असलेल्या तरुणाचा प्राण अशा पद्धतीने राजकीय हिंसाचार गमावण्याची वेळ येणे अतिशय दुर्देवी आहे. परिस्थिती हत्यांच्या बाहेर नको जावी या साठी शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती राष्ट्रीय सुरक्षा मंच ने पत्रकाच्या माध्यमातून केली आहे.