संघाच्या स्वयंसेवकाने घेतले स्वतःला जाळून

0

जयपूर :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका स्वयंसेवकाने स्वतःला जाळून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. हि घटना राजस्थानच्या जयपूरमध्ये घडली. ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत स्वतःला आग लावून 100 मीटरपर्यंत हा व्यक्ती पळत होता. भररस्त्यात जळणा-या व्यक्तीला पळताना पाहून लोकांनी त्याच्यावर पाणी टाकून आग विझवली. त्यानंतर त्याला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचे 80 टक्के शरीर जळाले असून प्रकृती गंभीर आहे.