संघ आणि नितीन गडकरी रचत आहे मोदींच्या हत्येचा कट

0

नवी दिल्ली-माओवाद्यांकडून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचला जात असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली होती. याच क्रमवारीत आता जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या माजी उपाध्यक्षा शेहला रशीद यांच्या एका ट्विटमुळे नवा वाद सुरू झाला आहे. शेहला या त्यांच्या ट्विटमुळे चांगल्याच अडचणीत येण्याची शक्यता आहे. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचत आहेत.

नंतर या हत्येचा आरोप मुस्लिम आणि कम्युनिस्टांवर करतील आणि मुस्लिमांच्या हत्या घडवून आणतील, अदर ट्विट शेहला यांनी केलर होते. या ट्विटमध्ये शेहला यांनी #RajivGandhiStyle या हॅशटॅगचाही वापर केला.